Published On : Fri, Nov 29th, 2019

‘हिट्स ऑफ उदीत नारायण सिझन – 2’ संगीतमय कार्यक्रम 1दिसम्बर रोजी

नागपुर: बॉलिट्यून्‍स म्‍युझिकल एंटरटेनमेंट्स अॅण्‍ड इव्‍हेंट्स व द सेलिब्रेशन इव्‍हेंट ऑर्गनायझर्सच्‍या संयुक्‍त्‍ विद्यमाने रविवार, 1 डिसेंबर रोजी ‘हिट्स ऑफ उदीत नारायण सिझन – 2’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्‍हील लाइन्‍स येथे सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम होणार असून यात 13 दर्जेदार वादक कलाकार सहभागी होत आहेत, अशी माहिती मयंक भोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसिद्ध पार्श्‍वगायक उदीत नारायण यांच्‍या 64 व्‍या वाढदिवसानिमित्‍त्‍ या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. मागील वर्षी याच कार्यक्रमाचा पहिला भाग म्‍युझिकल एंटरटेनमेंटतर्फे सादर करण्‍यात आला होता. शहरातील रसिकांना उच्‍च दर्जाचे संगीत ऐकायला मिळावे, या हेतूने बॉलिट्यून्‍स म्‍युझिकल एंटरटेनमेंट्स ही संस्‍था कार्य करते. मागील अनेक वर्षांपासून संस्‍थेद्वारे संगीत व इतर कार्यक्रमांचे आयेाजन करण्‍यात आले आहे, असे मयंक भोरकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची संकल्‍पना व निर्मिती व्‍हाइस ऑफ उदीत नारायण म्‍हणून ओळखले जाणारे बॉलिट्यून्‍स म्‍युझिकल एंटरटेनमेंट्सचे संचालक मयंक भोरकर यांची आहे.

सारेगामापाचे फायनलिस्‍ट मुंबईचे हरहुन्‍नरी गायक नानू गुजर, बॉलिवूडचे प्रसिद्ध गीटारिस्‍ट अरविंद हल्‍दीपूर, बॉलिवूडचे प्रसिद्ध ड्रमर जग्‍गी चांग या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. व्‍हाइस ऑफ विदर्भ स्‍वस्तिका ठाकूर, गौरी शिंदे, शितल टोकलवार, श्रुती बैवार, विजय चिवंडे हे गायक कलाकार प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांची गीते सादर करतील.

कार्यक्रमाचे निवेदन श्‍वेता शेलगांवकर व नासिर खान करणार आहेत.

कार्यक्रमाला मुख्‍य अतिथी म्‍हणून डॉ. गिरीश गांधी तर विशेष अतिथी म्‍हणून नैवेद्यमचे संचालक दिलीप कामदार व विजय जथे यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपसिथत राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.