Published On : Fri, Nov 29th, 2019

“लिटील गर्ल” ज्योती आमगे ला सुरक्षा मिळणार, सी.सी.टी.व्ही. चा सुद्धा समावेश करणार : पोलीस आयुक्तांचे आदेश

नागपूर : जगातील सर्वात लहान महीला ज्योती किसन आमगे, हिच्या घरी झालेल्या चोरीच्या प्रकरणामुळे ज्योती ही फार घाबरलेली असल्यामुळे तिने आमदार कृष्णा खोपडे यांचे माध्यमातून विशेष बाब म्हणून सुरक्षा मिळण्याबाबत पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले. आमदार महोदयांचे विनंतीवरून पोलीस आयुक्त यांनी तात्काळ कारवाई करीत नंदनवन पोलीस स्टेशचे पी.आय. श्री.पवार यांना लगेच फोन करून तात्काळ सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे सी.सी.टी.व्ही. कॅमरे लावण्याबाबत देखील चर्चा झाली असता पोलीस आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

आमदार कृष्णा खोपडे यांचे निवेदनात सांगितले की, ज्योती किसनजी आमगे, ही विश्वातील सर्वात लहान महिला म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद यांची नोंद आहे. नागपूर शहरच नव्हे, तर संपूर्ण भारत देशाला यांनी गौरवान्वित केले असून विदेशात देखील देशाचे नाव उंचावले आहे. देश विदेशातील अनेक नामांकित पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.

अमेरिकेतून परत येताना ज्योती आमगे यांचे परिवारातील व्यक्ती यांना आणायला विमानतळावर गेले असताना दि.09 नोव्हे. 2019 रोजी यांचे घरी चोरी झाली असून या घटनेची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला झालेली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये यांचे बहुमुल्य पुरस्कार चोरीला गेले नाही. यापूर्वी सुद्धा अशा प्रकरच्या घटना झाल्यास असून या परिसरात देखील अशा घटना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या घटनेमुळे ज्योती फार दुखी झाल्या असून भविष्यात अशा प्रकारची घटना झाल्यास काहीपण होऊ शकते, कदाचित यांचे जीवाला धोका सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भितीमुळे ज्योतीने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मा.पोलीस आयुक्तांना पत्र दिले. पोलीस आयुक्त यांनी सुद्धा लगेच कारवाई करून सहकार्य केले.

ज्योती आमगे, यांचे घरी भेट देऊन स्थिती जाणून घेतल्याचे सुद्धा आमदार खोपडे यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त कार्यालयात सेल्फिसाठी जमली गर्दी

पोलीस आयुक्त कार्यालयात ज्योती आमगे आलेली आहे, हि बातमी कळताच पोलीस आयुक्तांना भेटण्यास आलेले आगंतुक, पोलीस कर्मचारी व ज्योती अनेक चाहत्यांनी सेल्फी घेण्यास सुरुवात केली. ज्योतीने सुद्धा कुणालाच निराश केले नाही, सर्वांसोबत फोटो काढून हसत मुखाने त्यांना हस्तांदोलन देखील केले. सह पोलीस आयुक्त श्री.रविंद्रजी कदम यांची सुद्धा ज्योतीने भेट घेतली. एकंदरीत ज्योतीच्या आगमनाने पोलीस आयुक्त कार्यालयात कौतुहलाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी ज्योतीचे आई-वडील किसन आमगे, रंजना आमगे, अर्चना आमगे, कुणाल सिंग, भरत यादव, अनिल कोडापे, नविन भांडारकर, अजय मरघडे आदी उपस्थित होते.