Published On : Mon, Jun 7th, 2021

कळमना, चिखली येथील वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार

Advertisement

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ९ जून रोज पूर्व नागपुरातील कळमना आणि चिखली सह काही भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते ११ या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर कळमना, कळमना गाव,चिखली ले आऊट, सूर्य नगर,वांजरी परिसर, सुभान नगर, भांडेवाडी,छाप्रू नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. कावरा पेठ येथील वीज पुरवठा सकाळी ९ ते १२ या वेळेत बंद राहील. बिनाकी वीज उपकेंद्रात गुलशन नगर,वांजरी आणि वैष्णव देवी नगर येथील पुरवठा सकाळची ८ ते दुपारी १ या वेळात बंद राहील.

Gold Rate
25 July 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg 1,15,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement