Published On : Mon, Jun 7th, 2021

भंडारा येथील आशा सेविका भूमिका वंजारी यांना मिळाली मुख्यमंत्र्यांशी संवादाची संधी

• आशा स्वयंसेविकांशी संवाद
•कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पुर्वतयारी
•व्हिडिओ कॉन्फरन्सदवारे संवाद,

भंडारा – मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील सर्व आशा स्वयंसेविकांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुसंवाद साधला. भंडारा जिल्हयातील आशा स्वयंसेविका श्रीमती भुमिका वंजारी, प्रा.आ.केंद्र सालेभाटा, तालुका लाखनी यांना मुख्यमंत्री यांच्यासमोर आपले मनोगत मांडण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. मुख्यमंत्री यांनी आपल्याशी मुक्त संवाद साधला असून त्यांनी आमचे म्हणणे व अडचणी समजून घेतल्याची प्रतिक्रिया भूमिका यांनी व्यक्त केली.

मुलांमधील कोविड संसर्ग व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पुर्वतयारी म्हणुन बाल रोग तज्ञ टास्क फोर्स द्वारे कोरोना पासुन बालकांना होणारा संसर्ग कसा टाळता येईल व त्यापासुन त्यांचा बचाव व्हावा म्हणुन त्यावर काय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा केली.

बाल रोग तज्ञ टास्क फोर्स यांच्या मार्गदर्शनासोबतच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 4 जिल्यातील 4 आशाचे मनोगत एकुण घेतले. व सर्व आशांच्या कामाची स्तुती केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पुर्व तयारी म्हणून सर्व जिल्ह्यांनी नियोजन करावे असे सुचित केले. त्यात भंडारा जिल्हयातील आशा स्वयंसेविका श्रीमती भुमिका वंजारी, प्रा.आ.केंद्र सालेभाटा, तालुका लाखनी, यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली. यात श्रीमती भुमिका वंजारी आशा स्वयंसेविका यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भंडारा जिल्हात कोविड च्या कामात आशांनी आपले योगदान कसे दिले याबाबत सविस्तर माहिती दिली व कोविड मध्ये त्यांनी स्वतः कसे काम केले व काम करतांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

कोविड लसीकरणामध्ये आशांचा किती महत्त्वाचा सहभाग आहे व कसाप्रकारे ते काम करीत आहेत हे सुध्दा सांगितले आहे व सर्व नागरिकांनी न घाबरता लसीकरण करुन घ्यायला पाहिजे याबाबत माहिती दिली. तसेच आशाच्या विविध कामाविषयी त्यांनी माहिती दिली व पुढे येणाऱ्या तिसऱ्या लाटेबाबत पुर्व तयारी म्हणून काय करता येईल याबाबतच्या नियोजनाची सुध्दा माहिती दिली.

सदर व्हिडिओ कॉन्फरन्स करिता टेलीमेडिसीन सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा हे उपलब्ध करून देण्यात आले होते. या व्हिडिओ कॉन्फरन्स ला आशा स्वयंसेविका श्रीमती भुमिका वंजारी, नीता भुरे सोबतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर, जिल्हा समुह संघटक चंदु बारई हे उपस्थित होते. तसेच सदर व्हिडिओ कॉन्फरन्स करिता जिल्हातील 1050 आशा स्वयंसेविका, 52 गटप्रवर्तक 7 तालुका समुह संघटक उपस्थित होते.