Published On : Mon, Jun 1st, 2020

गंजीपेठ,भालदारपुरा येथे बुधवारी वीज पुरवठा बंद

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्ती सोबतच काही ठिकाणी एकात्मिक विकास योजनेतील शिल्लक कामे पूर्ण करावयाची असल्याने बुधवार दिनांक ३ जून रोजी मध्य नागपुरातील भालदारपुरा, गंजीपेठ येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

या सोबतच अयाचित मंदिर परिसर, लोधीपुरा, लोहापूल , लाकडीपूल, नंदनवन परिसर, राजेंद्र नगर,हसनबाग,सर्वश्री नगर,रामकिसन नगर, जिजामाता नगर, गोविंद प्रभू नगर, दिघोरी येथील वीज पुरवठा सकाळी ८ ते ११ या वेळेत बंद राहील. भांडे प्लॉट, मिरे ले आऊट, गुरुदेव नगर,ओम नगर, पांडव कॉलेज येथील वीज पुरवठा सकाळची ७ ते १० या वेळेत बंद राहील.