नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी महावितरणकडून बुधवार दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी उत्तर नागपुरातील उप्पलवाडी, टेका नाका परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत उप्पलवाडी, टेका नाका, पटेल नगर,महेंद्र नगर, फारूक नगर, सिद्धार्थ नगर,यशोधरा नगर,हबीब नगर,एकटा कॉलनी, यादव नगर, नरी गाव,स्वामी नगर, राणी दूरागावती चौक, पंचशील नगर,सुजाता नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.
शांती नगर,दही बाजार, मुदलियार चौक,डिप्टी सिग्नल, कावरा पेठ येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत, सकाळी ८ ते ११ या वेळेत किनखेडे ले आऊट, जामदार वाडी, मेहंडीबाग कॉलनी, दुपारी १२ ते २.. ३० या वेळेत चिखली, कळमना मार्केट परिसर, सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळात विनोबा भावे नगर, नागसेन नगर,कुंदनला गुप्ता नगर, टांडापेठ, खैरीपुर,नाईक तलाव, ठक्करग्राम, बिनाकी मंगळवारी, मोमीनपुरा, अन्सार नगर, डोबीनगर,चंद्रलोक बिल्डिंग परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील.
