Published On : Thu, Apr 5th, 2018

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान

मुंबई : वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध ११ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता उद्या (ता. ६) मतदान होत आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री.सहारिया यांनी सांगितले, या सर्व ठिकाणी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी होईल.

जिल्हा परिषद- पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग : हमदापूर (ता.सेलू, जि.वर्धा) आणि आनाळा (ता.परंडा, जि.उस्मानाबाद).

पंचायत समिती- पोटनिवडणूक होणारे निर्वाचक गण : पिंगुळी (ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग), नगाव (ता. जि. धुळे), तुर्काबाद (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद), संवदगाव (ता. वैजापूर, जि.औरंगाबाद), सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड), मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड), काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद), सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया), आजंती (ता. हिंगणघाट, जि.वर्धा), घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर) आणि मानापूर (ता.आरमोरी, जि. गडचिरोली).