मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यांनतर राजकीय वर्तुळात हालचाली सुरु झाल्या आहेत. याचं कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ताज लँड्स या हॉटेलवर पोहचले आहेत. राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात रात्री उशिरा एक बैठक झाली. त्यापाठोपाठ आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. यामुळे महायुतीत मनसे सहभागी होणार या चर्चा रंगल्या आहेत.
राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महायुतीत सहभागी झाली तर मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या ठिकाणी जागा देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.