Published On : Mon, Mar 15th, 2021

दोन दुचाकीचोरट्यास अटक करण्यात पोलिसांना यशप्राप्त

– आरोपिकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पेरकीपुरा येथील गजानन वैद्य यांच्या मालकीची घरासमोर उभी असलेली लाल बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 23 फेब्रुवारीला रात्री 10.30दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादीने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 379, 34 अनव्ये गुन्हा दाखल करीत शोधकामाला दिलेल्या गतीवरून दोन चोरट्याचा शोध लावून अटक करीत त्यांच्याकडून चोरी केलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या .अटक दोन आरोपीमध्ये कृतांक डोंगरे वय 24 वर्षे रा नागसेन नगर कामठी, अक्षय शेंडे वय 23 वर्षे रा शास्त्रीमंच वरठी भंडारा असे आहे.

या अटक आरोपिकडून फिर्यादी गजानन वैद्य ची चोरीस गेलेली लाल रंगाची बुलेट क्र एम एच 40 ए डब्लू 2099 किमती 60 हजार रुपये तसेच काळ्या रंगाची बुलेट क्र एम एच 40 ए एफ 8055 किमती 80 हजार रुपये,काळ्या रंगाची डी ओ एम एच 40 बी व्ही 9573 किमती 40 हजार रुपये, पांढऱ्या रंगाची एकटीवा क्र एम एच 49 डब्लू 2498 किमती 40 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाहो डिसीपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, डी बी स्कॉड चे राजेश पाली, संजय गीते, प्रशांत सलाम, आफाक अन्सारी, पवन गजभिये, अंकुश गजभिये, विजय सिन्हा, विवेक श्रीपाद यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी