नागपूर :अंबाझरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कॅम्पस चौक जवळील पब्लिको कॅफेत अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा युनिट 2 ने छापा टाकला. यादरम्यान ग्राहकांना तंबाखू-आधारित हुक्का फ्लेवर्स पुरवल्याबद्दल दोघांना अटक केली.
कॅफे मालक विकास राजू डागोर (31रा. रामनगर, तेलंगखाडी ) आणि कॅफे व्यवस्थापक नवनीत शंकर वारखडे (27, मंगळवारी बाजार, सदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी 15 हुक्का पॉट्स आणि तंबाखू-आधारित हुक्का फ्लेवर्सचा एक मोठा साठा जप्त केला, ज्याची एकूण किंमत 39,400 रुपये आहे.
पोलिसांची आरोपींविरोधात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) च्या कलम 4(1)(21) आणि 5(1)(21) अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.पुढील कारवाईसाठी आरोपींसह जप्त केलेले साहित्य अंबाझरी पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.