Published On : Mon, Aug 26th, 2019

पोलिसांनी दिले 12 गोवंश जनावरांना जीवनदान

कामठी :-स्थानिक नवीन कामठो पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भुयार पुलिया जवळून वाहन क्र एम एच 40 बी एल 9095 ने अवैधरित्या 12 गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून वाहन ताब्यात घेत वाहनातील गोवंश जनावरे जप्त करीत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशसवी कामगिरी आज दुपारी करण्यात आली असून पसार आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून या कारवाहितुन जप्त गोवंश जनावरे तसेच जप्त वाहन असा एकूण 5 लक्ष 5 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करन्यात आला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , एसीपी राजेश परदेसी , यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल व पथकांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

– संदीप कांबळे , कामठी