कामठी :-वासुदेव आणि देवकिच्या पोटी गोपालकृष्णने जन्म घेतलेला महान दिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्मष्टमी होय. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी तालुक्यात मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करण्यात आला.शुक्रवारला भविकभक्तांनी आपपल्या श्रद्धेनुसार भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्रतिष्ठापीत करून मोठ्या भक्तिभावाने महादेव घाटावर कान्होबाचे विसर्जन करण्यात आले.
भारतीय परंपरेनुसार श्रावण मासात येणारा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे या सणाचे महत्व वेगळेच आहे यानुसार भक्तांनी पहिल्या दिवशी पूजापाठ करून रात्र जागून कन्हैय्याचे आठवण केली व दुसऱ्या दिवशी नाचत गाजत भजन दिंडीने तसेच कुणी डोक्यावर कृष्णाची मूर्ती मांडून विसर्जनस्थळ असलेल्या महादेव घाटावर विसर्जन केले अशा भक्तिमय वातावरणात कन्हैय्याचे विसर्जन करण्यात आले.
संदीप कांबळे कामठी
