| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 18th, 2018

  एका महिन्याच्या आत पोलीस पाटलांचे मानधन वाढणार – धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन…

  Dr Ranjit Patil

  नागपूर : राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनाचा प्रश्न आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम ९३ अन्वये उपस्थित केला.त्यावेळी एका महिन्याच्या आत मानधन वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिल

  धनंजय मुंडे यांनी राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याबाबत, हंगामी पोलीस पाटलांना कायम करण्यासाठी आणि सेवानिवृत्तीनंतर वारसाला सेवेत सामावून घ्यावे, सेवेची कालमर्यादा वाढवावी आणि त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी-सवलती दयाव्यात असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले.

  त्यावर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस पाटलांसह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, कोतवालांच्या मागण्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याकरीता एकछत्र योजना तयार करण्यासाठी नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असल्याचे सांगितले.

  त्यावर धनंजय मुंडे यांनी महागाई प्रचंड वाढली आहे. अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करायची तेव्हा करा,आधी पोलीस पाटलांचे मानधनात वाढ करा अशी मागणी करून मागील काळात अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविले नव्हते का याकडे लक्ष वेधले. त्यावर पोलीस पाटलांचे मानधनही एका महिन्यात वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू याचा राज्यमंत्र्यांनी पुनरूच्चार केला. सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आमदार सुनिल तटकरे यांनीही पोलीस पाटलांच्या इतर मागण्यांबाबत कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी केली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145