Published On : Wed, Jul 18th, 2018

सालवा येथे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण करण्यात आले

कन्हान :ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय सालवा तसेच श्री साईं प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स सालवा येथे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला .

गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.महाराष्ट्रात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे.

दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवा च्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे. दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वन लागवडीच क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अनेकदा वृक्षलागवडीचे कार्यक्रम राबविले गेले, त्यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला परंतू वन लागवडीचे क्षेत्र किंवा जंगल क्षेत्र म्हणावे तेवढे वाढू शकले नाही हे खेदाने नमूद करावे लागते.

‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. असे प्रखर विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष व साईं सेवा शिक्षण मंडळाचे सचिव विजयराव कठाळकर हयानी मार्गदर्शनात व्यकत केले . या प्रसंगी प्रमुख पाहुणे धनपालजी हारोडे सरपंच येसम्बा, रवी बांगडे उपसरपंच येसम्बा, सौ जयश्रीताई पाटिल सरपंच सालवा,सुनील सरोदे वार्ताहार कन्हान, सतीश घारड वार्ताहार टेकाडी व राजेश मोटघरे मुख्याध्यापक ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय सालवा आदी प्रामुख्याने उपस्थीत होते. सर्व प्रथम वृक्षदिंडी काढुन जनजागृती करित वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळा , महाविद्यालय व कॉलेज च्या सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .