Published On : Thu, Apr 29th, 2021

पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांची तडकाफडकी बदली

कामठी :-सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीसावर शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते यानुसार नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत मागील तीन दिवसापासून सतत होणारे खुनाच्या घटना लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ अमितेशकुमार एक कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांची तडकाफडकी पाचपावली पोलिस स्टेशन ला बदली करण्यात आली तर त्यांच्या ठिकानी जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे यांची नियुक्ती करण्यात आली तर जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी अंबाझरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राहुल शिरे यांची नियुक्ती करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांची तडकाफडकी बदली झाल्याने पोलीस स्टेशन मध्ये एक भावणूक वातावरण निर्माण होत सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला व पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला,।याप्रसंगी तहसीलदार अरविंद हिंगे, एपीआय सुरेश कननाके, पोलीस उपनीरीक्षक वारंगे, पोलीस उपनिरीक्षक नरोटे, आदीउपस्थितहोते.

संदीप कांबळे कामठी