Published On : Thu, Apr 29th, 2021

येरखेड्यातील घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

– घरफोडी करणारे तीन आरोपीच्या अटकेसह 2 लक्ष 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्तसंदीप कांबळे कामठी

कामठी :-स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा रहिवासी फिर्यादी अविनाशकुमार सिंग वय 48 वर्षे हे आपल्या घराला कुलूप लावून घराचे मुख्य प्रवेशद्वार ची चाबी ही शेजारील मीरा यादव ला देऊन बिहार ला गेले असता घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यानी नियोजित पद्धतीने सापळा रचून मुख्य दाराचे कुलुप तोडुन घरात अवैधरित्या प्रवेश करून लोखंडी आलमारीतील साउंड सिस्टिम, एक दुर्गा माता ची पितळेची मूर्ती, फुलदाणी चे चार तुकडे, चांदी चे 2 ग्लास, चांदी ची एक पायल, चांदीचे सहा सीक्के, चांदीच्या चार बांगड्या, चांदीची बनावटीची मयूर, नगदी 7 हजार रुपये असा एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना 10 एप्रिल ला सकाळी उघडकीस आली.

याबाबत फिर्यादी ला शेजारील महिलेने फोन वर माहिती देताच 12 एप्रिल ला फिरयादीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 454, 457, 380 अनव्ये गुन्हा नोंदवुन तपासाला दिलेल्या गतीतून घटनास्थळी असलेले शेजारचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक ऑटो क्र एम एच 40 -2445क्रमांकाचा हा संशयित दिसून आला त्या आधारावर तपासचक्र फीरवीत घरफोडीचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यश प्राप्त झाले असून यातील 5 आरोपीवर गुन्हा दाखल करीत तीन आरोपीना अटक करण्यात आले तर दोन आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.या आरोपिकडून घरफोडीतील मुद्देमालासह इतर घटनेतील चोरीचा मुद्देमाल असा एकूण 2 लक्ष 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


अटक तीन आरोपीमध्ये नवीन मिलिंद बारसे वय 20 वर्षे रा दुर्गा सोसायटी येरखेडा, फैजाण वकील अहमद वय 18 वर्षे रा मोमीनपुरा नागपूर, संजोग होले वय 22 वर्षे रा टिमकी नागपूर असे आहे तर आकाश व मुनिर नामक दोन आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.या आरोपिकडून काळ्या रंगाची वाहन हिरो कंपनीची दुचाकी क्र एम एच 31 ई डी 6187 किमती 20 हजार रुपये, एक लोह्याचे रॉड किमती 200 रुपये, नगदी रक्कम 3000 रुपये, हिरो स्प्लेडर दुचाकी क्र एम एच 40 ए व्ही 6044 किमती 20 हजार रुपये, एक ऑटो क्र एम एच 40 -2445किमती 1 लक्ष रुपये, एक पितळी ची मूर्ती 500 रुपये, 20 ग्राम सोन्याचा डल्ला किमती 1 लक्ष रुपये, चांदीचा कमरपट्टा किमती 6 हजार रुपये, चांदीचा आकडा किमती 500 रुपये,चांदीचा पैंजनवजनी किमती 3 हजार रुपये,चांदीचे 7 नग किमती 3 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष 58 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक विजय मालचे, पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय कँननाके, डी बी स्कॉड चे मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सुधोर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, सुरेंद्र शेंडे, उपेंद्र आकोटकर यांनी केलें असून पुढील तपास सुरू आ