Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Sep 19th, 2020

  Viral Video: नागपूर ग्रामीण पोलिस हवलदारावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपीनां स्थानिक गुन्हे शाखा ने जेरबंद केले

  नागपुर – १६ सितंबर ला पोलीस स्टेशन कन्हान नागपूर ग्रामीण येथे तैनातीस असलेले पोलीस हवलदार /१८ रवी तुळशीराम चौधरी यांनी कन्हान येथील सराईत गुन्हेगार कमलेश हिराचंद मेश्राम यांच्या भावावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा मनता राग घेरुन पोलीस हवालदार रवी चौधरी यांना धोक्याने त्यांच्याबद्दल माफी मांगावयाची आहे असे कारण सांगून गृह येथे बोलाविले व माझे भावावर कारवाई का केली असे म्हणून धारदार शस्त्राने पोटावर,मांडीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम तेथील सीसीटीवी कैमेरा मध्ये कैद झाला.

  त्यानुसार स्वतःच्या जीव वचविन्यासाठी ते कन्हान येथील शासकीय रुग्णालय येथे उपचारार्थ गेले असता, त्यांच्या प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेवरून पोस्टे कन्हान येथे अपघात क्रमांक ३५८/२०२० कलम ३०७,३५६,३३३,३४ भादवि अन्वये दाखल करण्यात आला आहे.

  सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. श्री. राकेश ओला ,पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच घटनास्थळी येथे भेट देऊन आरोपी नामे कमलेश हरिचंद मेश्राम,वय ३० वर्ष, रा.इंदिरा नगर कन्हान व त्याचा साथीदार नामे अमान अनवर खान,वय १९ वर्ष , रा.संताजीनगर कन्हान यांचे नावे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीतांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश देत स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण येथील विशेष पथक तयार करून समांतर तपास करण्याचे आदेश दिल्याने, श्री. अनिल जिट्टावार पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांनी समांतर तपासाची सुत्रे हरवून प्राप्त गोपनीय माहितीच्या वर आधारे नमुद दोन्ही आरोपी हे रामटेक परिसरात लपून आहेत, अशा माहितीवरून मोठ्या शिताफिने दोन्ही आरोपींना रामटेक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

  त्यांनी उपरोलेख्खीत प्रमाणे कारण सांगून पोलीस हवलदार रवी चौधरी यांना जीवे मारण्याच्या घटनेला दुजोरा देत हकीकत सांगितले. सध्या दोन्ही आरोपीतांना पोलीस स्टेशन कन्हान नागपूर ग्रामीण यांच्या ताब्यात पुढील तपास देण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उप अधीक्षक अधिकारी,कन्हान विभाग करीत आहे.

  सदर कार्यवाही मा. श्री. राकेश ओला ,पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण तसेच श्रीमती मोनिका राऊत,अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात श्री. अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे,पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख तसेच पोलिस सपोउपनि लक्ष्मीकांत दुबे, पोहवा- नाना राऊत, निलेश बर्वे, पोना-सुरेश गते,दिनेश अदापूरे, शैलेश यादव ,सत्यशील कोठारे पोशि-अमोल वाघ, प्रणय बनाफर,वीरेंद्र नरड़, विपिन गायधने, चासपोउपनि-साहेबराव बहाळे, चापोना-अमोल कुथे यांचे पथकाने पार पडली.सदर कारवाई नागपूर ग्रामीण सायबर सेलचे पोशि- सतीश राठोड,दिनेश राजगिरे यांनी मोलाचे सहकार्य केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145