Published On : Fri, Sep 18th, 2020

रामटेक तालुक्यात दोघांचा कोरोना ने मृत्यू.

दोन दिवसात 24 रुग्णांची भर कोरोणाचा आकडा पोहोचला ४३९ वर.

रामटेक तालुका बनत आहे कोरोनाचा हॉटस्पॉट.

मृतकांचा आकडा १६ वर प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना राबविणे गरजेचे

रामटेक: रामटेक तालुक्यात झपाट्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दोन दिवसांत कोरोनाचे २४ रुग्ण वाढले आहेत.
यात शहरातील शास्त्री,राधाकृष्णन, गांधी, अंबाला,आणि रमालेश्र्वर वार्ड व ग्रामीण भागातील परसोडा , भोजापुर, हमलापुरी, किरनापुर, वाहिटोला शितलवाडी,अशे ग्रामीण व शहर मिळून दोन दिवसात २४ रुग्णांची नव्याने भर झाली असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालय चे वैदकिय अधिकारी डॉ. वरके यांनी दिली.

आतापर्यंत कोरोनाचा आकडा ४३९ पर्यंत पोहोचला आहे. तर आतापर्यंत फक्त ९१ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती नायब तहसीलदार मनोज वाडे यांनी दिली. रामटेक तालुक्यात दोघांचा कोरोना ने मृत्यू झाल्याने रामटेक शहर आणि ग्रामीण मिळून मृतकांचा आकडा हा आता १६ वर येऊन पोहोचला *आहे अशी माहिती नायब तहसीलदार मनोज वाडे यांनी सांगितली .


कोरोनाचा आकडा वाढतीवर असून बाहेर पडताना काही नागरिक मास्क लावत नाही आहेत, काही नागरिक सोशल डिस्टंसिंग चा सर्वत्र फज्जा करत आहे. ,बोलताना ज्यावेळी मास्क तोंडावर ,नाकावर हवा तेव्हा मास्क नाका खाली खाली असतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची खबरदारी स्वतः घेणे फार गरजेचे असल्याचे नायब तहसीलदार मनोज वाडे यांनी सांगितले”

शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग वाढल्या मागे प्रशासकीय यंत्रणेला अजुन कोणत्या प्रकारच्या उपयोजना कराव्या लागतील जेणे करुन कोरोणा सारख्या ह्या महाभयंकर बीमारी वर काबू मिळेल. रामटेक तालुक्यात कोरोनाचा सतत कहर सुरूच असून कोरोणचा ब्लास्ट सुरूच आहे. “कोणत्या अजुन गांभीर्याने उपाय योजना करून प्रशासन कोरोना वर नियंत्रण आणणार? असा यक्ष प्रश्न जागरूक नागरिक करीत आहे. उद्भवणाऱ्या बाबीवर नायब तहसीलदार मनोज वाडे,तालुका वैदकिय अधिकारी डॉ.चेतन नाईक वार , नगरधन प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैदकीय अधिकारी डॉ.स्मिता काकडे. डॉ. मरकाम , डॉ.वरके लक्ष ठेऊन आहेत.