नागपूर : वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर भाष्य करणाऱ्या ‘नशा तूफान का’ या हिंदी चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन आज नागपूरातील संगम टॉकीज येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी उपस्थित राहून चित्रपट पाहिला.
व्यसनाच्या दुष्परिणामांवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष स्क्रीनिंगमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला चित्रपटाची संपूर्ण कलाकार मंडळी आणि निर्मिती चमूदेखील उपस्थित होता.
यावेळी पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी चित्रपटाच्या सामाजिक संदेशाचे कौतुक केले. युवकांना व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी अशा चित्रपटांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नशा तूफान का’ या चित्रपटातून व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान प्रभावीपणे मांडण्यात आले असून, युवकांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...
छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...
हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...
40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...
2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political
बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...





