Published On : Mon, Dec 2nd, 2019

अतिक्रमण निर्मूलनसंदर्भात पोलिस आयुक्तांची महापौरांसोबत चर्चा

Advertisement

नागपूर: शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी (ता.२) महापौर संदीप जोशी यांची भेट घेउन चर्चा केली. महापौर कक्षात झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त अभिजीत बांगर, वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडीत उपस्थित होते.

शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या विळख्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मनपातर्फे कठोर पाउल उचलण्यात येत आहे. अतिक्रमण संदर्भात येत्या ७ डिसेंबरला मनपाची विशेष सभाही घेण्यात आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ मोकळे व्हावेत, शहर अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी मनपा व पोलिस विभाग एकत्रित समन्वयाने कार्य करेल, असा विश्वास यावेळी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरातील वाढते अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. काही बाबतीत मनपा तर काही बाबतीत पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र संपूर्ण शहरातून अतिक्रमण हद्दपार करण्यासाठी मनपा व पोलिस विभागाने एकत्रित येउन कारवाई करणे गरजेचे आहे, यासाठी पोलिस विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.

मनपा व पोलिस विभागाकडून संयुक्तरित्या करण्यात येणारी कारवाई, दोन्ही विभागातील समन्वय आणि यासाठी आवश्यक बंदोबस्त या सर्वांबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement