Published On : Tue, May 15th, 2018

पंतप्रधानांच्या कामांचा विजय : ऊर्जामंत्री बावनकुळे

C Bawankule

नागपूर: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाला मते देऊनक त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळेच कर्नाटकात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत उदयास आला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर-भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

जनतेने पुन्हा विकासाकडे आपले मत वळविले असल्यामुळेच सर्वात जास्त भागात भाजपाचे कमळ फुलले आहे. काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची खेळी रचली होती. त्यामुळे भाजपाचे लिंगायत समाजातील समर्थक काँग्रेसकडे वळतील असे काँग्रेसला वाटले होते. पण लिंगायत समाज भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे या समाजाने दाखवून दिले आहे. परंपरागत काँग्रेस समर्थक मुस्लिम बहुल क्षेत्रातही भाजपाने बाजी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा, धोरणांचा हा विजय आहे. संपूर्ण कर्नाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचेही या निकालांनी स्पष्ट केले असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement