Published On : Mon, Jun 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात महिलेला एमडी ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट; क्राइम ब्रँचकडून आरोपीला अटक

Advertisement

नागपूर-नागपूरमध्ये एका महिलेला खोट्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याचा धक्कादायक कट क्राइम ब्रँचने उधळून लावला आहे. वैयक्तिक वादातून आरोपीने महिलेच्या दुचाकीत एमडी ड्रग्ज लपवून ठेवत पोलिसांना खोटी माहिती दिली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण कट उघडकीस आला आणि क्राइम ब्रँचच्या युनिट-२ ने आरोपीला अटक केली.

क्राइम ब्रँच युनिट-२ ला रविवारी रात्री गोपनीय माहिती मिळाली की, वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहिल कॉम्प्लेक्सजवळ उभी असलेल्या एका महिलेच्या मोपेडमध्ये एमडी पावडर ठेवण्यात आली आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीची तपासणी केली असता, फुटरेस्टखाली दोन पाऊचमध्ये सुमारे ८ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.

Gold Rate
Aug 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,600 /-
Silver/Kg ₹ 2,36,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी संबंधित महिलेने हे अमली पदार्थ आपले नसून, कोणीतरी जाणूनबुजून आपल्याला अडकवण्यासाठी दुचाकीत ठेवले असल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात गोपाल किशन झोडगे यानेच महिलेच्या मोपेडमध्ये एमडी पावडर ठेवल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वैयक्तिक वादातून महिलेविरुद्ध खोटा एनडीपीएस गुन्हा दाखल व्हावा, या उद्देशाने आपणच पोलिसांना खोटी माहिती दिल्याची कबुली त्याने दिली.

Advertisement

या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एमडी पावडर, एक मोबाईल फोन आणि एक मोपेड असा सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत.

Advertisement
Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?

Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?

NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन

NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन

RTO में रिश्वत का खेल बेनकाब! #NagpurNews #NagpurRTO #RTO #RTOScam #RTOCorruption #ACBRaid #Crime

RTO में रिश्वत का खेल बेनकाब! #NagpurNews #NagpurRTO #RTO #RTOScam #RTOCorruption #ACBRaid...

चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate #maharashtra

चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate...

दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident #newsupdate #news

दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident...

लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन महिलाएं मिलीं, लॉज का संचालक और गिरफ्तार..

लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges