Published On : Tue, Mar 3rd, 2020

रामटेकात खडीगंमत,भजन व किर्तनाचे शानदार उदघाटन

Advertisement

रामटेक : रामटेक येथे २ मार्च २०२० रोज सोमवारला प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने तसेच संत महंत ऋषी-मुनी व महान कवी कालिदास यांच्या काव्यरूपी तपाने पावन झालेल्या या रामटेक सांस्कृतिक भूमीत खडीगंमत व भजन कीर्तन महोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. उद्घाटनाप्रसंगी कला मंचावर नगराध्यक्ष दिलीप देशमुख, यासह प्रमुख पाहुणे नगरसेवक आलोक मानकर,धर्मदास भिवगडे, अलंकार टेंभुर्णे, शाहीर वसंत डांभरे संदीप शेंडे सहाय्यक निबंधक मुंबई उपस्थित होते सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत झाले. व लगेच शाहीर अलंकार टेंभुर्णै यांनी शाहीरी थाटात पोवाड्याच्या माध्यमातून पाहुण्यांचेस्वागत केले.

त्यानंतर भव्य दिव्य अशा खडीगंमत व भजन कीर्तन महोत्सवांमध्ये हजारो कलावंतांनी सहभाग घेऊन लोक कले प्रती आपली आस्था व जीव हाडा दर्शविला प्रत्येक कलावंत कलेच्या आवेशात दिसत होता हे बघून लोक केले ला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असे दिसू लागले अलीकडे लुप्त पावत चालली पारंपरिक लोककला एक समृद्ध झाल्यासारखे वाटत होती. कलावंतांनी उस्फूर्तपणे शहराचा मुख्य भागातून मिरवणुकीचे दर्शन घडविले या मिरवणुकी मधून पारंपरिक लोककलेचा व इत्यादी कला सादर करीत प्रचंड चैतन्य निर्माण केले व संपूर्ण वातावरण संगीतमय करून टाकले .

यामध्ये नवीन म्हणून वागोबा जून दिसेनासा झाला आहे त्या अनुषंगाने जनतेला त्याचे दर्शन झाले आहे. पारंपारिक लोककलेचे जतन व संवर्धन करण्याकरता सांस्कृतिक कार्य विभागाचे सहाय्यक संचालक श्री संदीप शेंडे साहेब यांनी प्रस्ताविक सादर केले व वैदर्भीय खडीगंमत सोबतच इतर पारंपारिक लोककला आहेत त्याचा विकास करून त्याकडे तरुण पिढीला कसे आकर्षितकरून घेता येईल याकरितासंस्कृती विभागामार्फत विविध कार्यक्रम तसेच अनेक शासकीय योजना राबवित आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले .

तसेच शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी खडी गमती सोबतच इतर ज्या पारंपारिक लोकल आहेत त्यांना सुद्धा अनुदान पॅकेजमध्ये समाविष्ट करून घ्यावे असे सांगितले त्याप्रमाणे भिवगडे साहेबसाहेब यांनी आजही कलावंत बऱ्याच योजनेपासून वंचित आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत असे सांगितले. महोत्सवानिमित्त अकरा वाजेपासून भजन-कीर्तना ला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सायंकाळी सहा वाजता खडी गमतीला सुरुवात झाली

मार्गदर्शनानंतर शाहिरा चौधरी यांनी आपल्या मंडळाच्या शाध्यमातून खडीगंमत सादर केली बेटी पढाव बेटी बचाव या विषयावर कार्यक्रम सादर करून लोकांचे मनोरंजनातून समाज प्रबोधन केले लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिला शेवटी मुजराकरून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाप्रकारे खडीगंमत व भजन कीर्तन महोत्सवाचे पहिल्या दिवसाचे मोठ्या उत्साहात समाप्ती करण्यात आली.