Published On : Thu, Jul 22nd, 2021
By Nagpur Today Nagpur News

कळमना मार्केटजवळील मैदानात कडुनिंबाच्या ३०० रोपांची लागवड

नागपूर : नागपूर शहरातील विविध भागात साकारत असलेल्या ऑक्सिजन झोन अंतर्गत बुधवारी लकडगंज झोनमधील कळमना मार्केट जवळील नासुप्रच्या मैदानात महापौर दयाशंकर तिवारी व पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते ३०० कडुनिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी माजी स्थायी समिती सभापती व ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पोहाणे, ईश्वर कावरे, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, बाळा वानखेडे, रामावतार अग्रवाल, अजय तारोडकर, संदीप दखनकर, भारत सारवा, राकेश पाटील, शैलेश नैताम, उर्मिला भोंडे, शंकर गौर, गुलाब माथूरकर, नंदा पालांदुरकर, आशिष मेहर, भूषण इंगळे, प्रमोद शाहू, मनोज शेंदरे, रवी गजधाने आदी उपस्थित होते.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कडूनिंब हे बहुगुणी तसेच बहुपयोगी औषधी वृक्ष आहे. या वृक्षाचे बहुगुण लक्षात घेता नागपूर शहरात साकारत असलेल्या ऑक्सिजन झोनमध्ये बहुतांशी कडूनिंबाच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे कडुनिंबाचे महत्व पुढील पिढ्यांना कळावे यासाठी नागपूर महानगरपालिकेने कडूनिंबाला ‘राष्ट्रीय वारसा वृक्ष’ म्हणून घोषित करावे, यासंदर्भातील ठराव सभागृहात मंजूर करून त्याबाबत राज्य शासनाला पत्र पाठवून कडूनिंबाच्या झाडाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement