Published On : Thu, Jul 22nd, 2021

आमदार निधीतून दीड कोटींच्या डांबरीकरण कार्याचा प्रारंभ

– लकडगंज झोनसभापती मनिषा अतकरे यांचे प्रयत्न : प्रभाग ४ मधील कार्य

नागपूर : लकडगंज झोनच्या सभापती मनिषा अतकरे यांच्या प्रयत्नातून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या विकास निधीमधून प्रभाग ४ मध्ये १.५ कोटींच्या रस्ता डांबरीकरणाच्या कार्याचा बुधवारी (ता. २१) प्रारंभ झाला.

प्रभाग ४ अंतर्गत असलेल्या महादेव नगर, संत ज्ञानेश्वर सोसायटी, मंगलमूर्ती सोसायटी येथील संपूर्ण रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण कार्याचे भूमिपूजन आ. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, भाजप नागपूर शहरचे संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके, भाजपचे पूर्व नागपूर अध्यक्ष संजय अवचट, कोषाध्यक्ष बबलू आचार्य, लकडगंज झोन सभापती मनिषा अतकरे, नगरसेवक राजकुमार साहू, नागपूर टिंबर मर्चंट असोशिएशनचे अध्यक्ष दिनेशभाई पटेल, भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेश ठाकरे, प्रभाग अध्यक्ष शैलेश शाहू यांची यावेळी प्रमुख उपस्७ती होती.

संचालन आणि आभार प्रदर्शन अमूल ठाकरे यांनी केले. यावेळी नंदलाल बिसेन, अरुण हरोडे, अरुण खोपड़े, सुबोध मानवटकर, सूरज अरसपुरे, विवेक ठवकर, दीपा मुंडेकर, शिला ठाकरे, उर्मिला बोंडे, विपुल पटेल, मनिभाई पटेल, विशाल गौर, रीता ठाकरे, कुन्दा बिरोले, रत्नमाला ठाकरे, प्रभाबेन पटेल, सारंगी कुलारकर, लता बिसेन, दीपिका पटिये, सीनू काबरा, प्रियंका गुप्ता, दिव्या पटेल, जयाबेन पटेल, सुनीता खोपड़े, कस्तुरा पटेल, चंद्रिकाबेन पटेल, पार्वतीबेन पटेल, हर्षला लाड़, कांतमा बोलल, रोशनी बिरोले, अर्चना ओक्सिया, अनिल गुप्ता, ललित काबरा, विजय पटेल, अंकित लाड़, विशाल यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.