Published On : Sat, Jul 20th, 2019

कामठी न्यायालयात वृक्षारोपण

कामठी :-33 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज झाली असल्याचे मनोगत दिवाणी व फौजदारी न्यायाधीश भोला यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सहदीवाणी न्यायाधीश गाडवे, दुसरे सहदीवाणी न्यायाधीश गायकवाड, कामठी वकील संघाचे अध्यक्ष एम एस शर्मा, सचिव गजवे, सहसचिव व्ही एम जांगडे यासह वकील वर्गातील भूषण तिजारे, अधिवक्ता दिपाणी, लाईक हुसैन, बागडे, राजविलास भीमटे, अविनाश भीमटे तसेच न्यायालयिन अधिकारी कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी