Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 23rd, 2019

  वेकोलि व्दारे जि प शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बँग वाटप करून वृक्षारोपण

  कन्हान : – वेकोलि गोंडेगाव खुली कोळशा खदान व्दारे जि प उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्कूल बँग व मिठाई चे वितरण करून वृक्षारोपण करण्यात आले.

  सोमवार (दि.२२) ला वेकोलि गोंडेगाव खुली खदान व्दारे न्यु गोंडेगाव जि प उच्च प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना श्रेत्रीय महाप्रबंधक मा दिवाकर गोखले, गट विकास अधिकारी मा प्रदीप बम्हनोटे, उप श्रेत्रीय प्रबंधक मा तरूण कुमार त्रिवेदी यांच्या हस्ते स्कूल बँग व मिठाई चे वितरण करून शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

  याप्रसंगी विस्तार अधिकारी कैलास लोंखडे, गोंडेगाव सरपंच नितेश राउत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे, ग्रा प सदस्य आकाश कोडवते, मोरेश्वर शिंगणे, कृणाल मधुमटके सह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145