Published On : Tue, Jul 23rd, 2019

राज्यातील पाच जिल्हा परिषदेवर प्रशासक.

जिल्हा परिषद निवडणुकांवर चर्चा मंथन सुरू उपाध्यक्षाची निवासस्थाने खाली करण्याचे प्रशासकाच्या बांधकाम विभागाला दिल्या सूचना .आता कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता !

रामटेक -सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषदा बरखास्त करण्यात आल्या आहेत. या पाचही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्या आतापर्यंत कार्यरत होत्या.

Advertisement

भारतीय लोकशाहीत स्थानिक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाने जिल्हा परिषद बरखास्त करून सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहे. गुरुवारी शासन निर्णय जारी झाला आणि जिल्हा परिषद सदस्यांना मोठा धक्का बसला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्याची लवकरच शक्यता आहे. महिन्याभरात जिल्हा परिषद च्या निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत .

Advertisement

आता कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता लागू शकते .या निवडणुकी सोबतच पुढे विधानसभेचीही निवडणूक होणार आहे .या आचार सहीण्तेत विकास कार्यासोबतच लाभाच्या योजना अडकू नये यासाठी प्रशासक व सीईओ संजय यादव यांनी तांत्रिक मान्यता ,प्रशासकीय मान्यता ,टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना बैठकीतून सर्व विभाग प्रमुखांना केल्या आहेत . आचारसंहितेत कुठल्याही योजना रखडू नयेत म्हणून प्रशासनानए कामाची गती वाढविली असल्याचे सांगून प्रलम्बीत कामांना गती देणार असल्याचे सीईओ संजय यादव यांनी सांगितले ..

फेब्रुवारी २0१७ मध्येच जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आला होता त्यामुळे तडकाफडकी जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला व लगेच तसेच आदेश काढल्यामुळे सर्वाना धक्काच बसला .

सत्ता ही संधी आहे. तिचा योग्य वापर केला तर ती परतपरत वाटेला येते. परंतु, थोडीशी फारकत झाली की ती शोधून किंवा जंगजंग पछाडूनही पदरात पडत नाही, हे सर्वर्शुत आहे. शासनाच्या बरखास्तीच्या एका आदेशाने ‘सत्तासुंदरी’ एका क्षणात निघून गेली आणि सर्व सत्ताधारी निमूटपणे पाहत राहिले. अचानक हातून सत्ता गेल्यामुळे पदाधिकाऱ्यांमधे निराशा पसरली असल्याची चर्चा आहे ऐकावयास मिळाली .

विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांची पदे सम्पुषटात आल्यानंतर ग्रामीण जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कक्ष कार्यालय कुलूप बंद झाल्याने आता सीईओ हेच जिल्हा परिषद चे सर्वासर्वे आहे .प्रशासक नियुक्त होताच जिल्हा परिषद मध्ये राहणारी ग्रामस्थांची वर्दळही आता कमी झाल्याचे दिसून येत आहे . आता जिल्हा परिषद व विधानसभा निवडणूक समोर असल्याने तिकीट मला कशी मिळेल याकरीता मोठ्या नेत्यांकडे साकडे घालणे सुरू झाली आहे.सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा होण्यास सुरुवात झाली असल्याचे निदर्शनास आले .

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement