| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 23rd, 2019

  नासुप्र येथे बाळ गंगाधर टिळक यांची १६३वी जयंती साजरी

  नागपूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६३वी जयंती आज मंगळवार, दिनांक २३ जुलै रोजी नागपूर सुधार प्रन्यास येथे साजरी करण्यात आली.

  यावेळी नामप्राविप्र’चे अप्पर आयुक्त श्री. हेमंत पवार यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

  यावेळी नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. लांडे, कार्यकारी अभियंता (मुख्यालय) श्री. पी.पी. धनकर, कार्यकारी अभियंता श्री. राजेश मेघराजानी, आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवदूत आणि जनसंपर्क व सचिव-१ श्रीमती कल्पना गीते तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145