Published On : Tue, Sep 17th, 2019

अतिवृष्टीने पिपरीच्या बेघरांना आ. रेड्डी व्दारे टिना व पाईपची मदत

कन्हान : – पिपरी धरमनगर येथील लखन बावने व टेकचंद भरणे यांचे राहते घर अतिवृष्टीने मध्यरात्री कोसळल्याने दोन्ही परिवार बेघर झाल्याची बातमी दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार हयानी धावपळ करून शासनाकडे मदतीची मागणी केली. परंतु स्थानिक आमदार डी एम रेड्डी हयानी स्वतः दोन्ही कुंटुबाना लोंखडी टिनापत्रे व पाईपची मदत केली.

कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र ३ धरमनगर पिपरी येथील रहिवासी हातमजुरीचे कामधंदा करून कुंटुबीयांचा उदरनिर्वाह करण्या-या कुटुंबाचे एकमेव राहण्याचे घर सतत पावसाच्या अतिवृष्टीने मध्यरात्री सोमवार (दि.९) ला लखन बावणे व बुधवार (दि.११) ला टेकचंद भरणे यांचे राहते घर कोसळल्याने दोन बक-यांचा मुत्यु झाला. दोन्ही कुंटुबाचे जिवनाश्क वस्तु मातीचा मलब्यात अन्न, वस्त्र व सामान दबुन उद्धवस्त होऊन राहण्याची आणि दोन वेळेचे जेवन व कपडय़ांची सुद्धा सोय नसल्याने दोन्ही कुंटुब जिवन मरणासन्न यातनेच्या उबंरठयावर असुन कुंटुबाला उघड्यावर जिवनव्यापन करण्याची पाळी ओढावल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार हयानी धावपळ करित शासन, प्रशासनास निवेदन देऊन दोन्ही कुंटुबाची व घराची पाहणी करून त्वरित शासनाव्दारे आर्थिक मदतीचे सहकार्य करून यथोचित मदत करावी अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने केली.

तसेच स्थानिक आमदार डी एम रेड्डी यांची भेट घेऊन दैनिक वृत्तपत्राची बातमी दाखवुन बेघरांना मदतीची मागणी केली होती. तहसिलदार वरूण सहारे यांनी तलाठी कडुन पाहणी करून अहवाल मागुन शासनकडे पाठविण्यात आला असून शासकीय अद्याप कुठलीच मदत न मिळाल्याने आमदार डी एम रेड्डी हयानी स्वत: दोन्ही कुंटुबाच्या घराच्या छताकरिता लोंखडी टिनापत्रे व पाईपची सोमवार (दि.१६) ला मदत करण्यात आल्याने सर्व प्रथम दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित केल्या बाबत पत्रकारांचे व वेळोवेळी प्रशांत मसार हयानी धावपळ करित तात्पुरते राहण्याची समाज भवनात व्यवस्था करून सहकार्य केल्यामुळे तसेच आमदार डी एम रेड्डी हयानी घराच्या छताकरिता मौलिक मदत करण्यात आल्याने लखन बावने व टेकचंद भरणे कुंटुबियासह ग्रामस्थ परमानंद शेंडे, फत्तुजी वालदे, दिपक तिवाडे, धिरज विणकणे, गोपाल कुंभरे, दिलीप डोंगरे, सुभाष मडावी, ओमकार निमजे, अशोक डडुरे, विवेक खोब्रागडे, प्रकाश भोपे, राजकुमार भरणे, भोला भोयर, मंजु यादव, इंदिरा वालदे, जयश्री डोंगरे , जया खोब्रागडे, सुनंदा कुंभरे, ताराबाई भोपे आदीने मनपुर्वक आभार व्यकत केले आहे.