Published On : Tue, Sep 17th, 2019

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात डॉ राजेश द्विवेदी वर हल्ला….

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश द्विवेदी यांच्यावर संतप्त जख्मि रुग्णाच्या वडीलाने अंगावर हात उगारून मारझोड करीत हल्ला केल्याची घटना आज दुपारी सव्वा वाजेदरम्यान घडली असून या घटनेने रुग्णालतातील सर्व अधीकारी कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार नियमित रित्या आकस्मिक विभागात जख्मि वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश द्विवेदी हे रुग्ण तपासणी करते वेळी एक 17 वर्षोय रुग्ण उजव्या पायाला असलेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी आई वडिलांसोबत आले असता उपचारा दरम्यान रुग्णाला इंजेक्शन लावून द्या ही मागणी केली असता इंजेक्शन लावणारी परिचारिका जेवणाला गेले असल्याने काही वेळ थांबायचे सांगितले असता दरम्यान वैद्यकीय अधिकारी व रूग्णचे वडील यांच्यातील झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन मारहाणीत पोहोचला दरम्यान जख्मि रुग्णाच्या संतप्त वडिलाने डॉक्टर राजेश द्विवेदी च्या तोंडावर हातबुक्क्याने मारहाण करून जख्मि केले.वेळीच उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचारी तसेच नागरिकांनी मध्यस्थी ची भूमिका घेत वाद सोडविला.

Advertisement

मात्र मारझोड करणाऱ्या संतप्त अज्ञात इसमाने वैद्यकीय पावतीत नाव नमूद असलेली पावती घेऊन दवाखान्यातून पळ काढल्याने मारझोड करणाऱ्या या अज्ञात इसमाचा शोध लागू शकला नाही .घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे , दुय्यम पो नि परदेशी व डी बी पथकांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपीची ओळख पटवण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करीत शोधकामी रवाना झाले आहेत.

या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी शाब्दिक वादासह त्यांचा अंगावर चढून जाणे हे नित्याचीच बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर अपुऱ्या अधिकारी कर्मचाऱ्या अभावी दैनंदिन एक हजार रुग्णांची ओपीडी सांभाळणे हे जिकिरीचे काम झाले आहे तर सदर घटणेचा निषेध नोंदवित रुग्णालयात खुद्द अधिकारी कर्मचारी असुरक्षित असल्याची बतावणी करीत रुग्णालयात असलेली पूर्ववत बंद पडलेली पोलीस चौकी त्वरित सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement