नागपूर : नुकत्याच (२२ सप्टेंबर २०२३ च्या रात्री नागपुरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे वर्धा रोड-पंचशील चौक जवळील नाग नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला होता आणि काही भाग वाहून गेला होता.
हा पूल नवीन बांधण्यात येणार आहे आणि त्याच साठी जुन्या जीर्ण झालेल्या पुलाला तोडण्याचे कार्य सुरु असताना , त्याच्या बाजूने जाणारी ३०० मी मी व्यासाची मुख्य जलवाहीनी आज सकाळी पडली .
अचानक झालेल्या ह्या अपघातामुळे, सीताबर्डी -२ कमांड एरिया च्या अर्थात सीताबर्डी, रामदासपेठ, धंतोली, छोटी धंतोली तसेच यशवंत स्टेडियम चा परिसर आणि मेहाडिया चौक येथील आजूबाजूच्या परिसरातील पाणीपुरवठा बाधित झाला. जलवाहिनी दुरुस्तीचे कार्य मनपा-OCW ने तातडीने सुरु केलेलं आहे आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. पण परिस्थिती बघता जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत वरील भागाचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .
मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत
अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .