Advertisement
नागपूर: नालंदा नगर व श्री नगर येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे सुरू आहे. ते काम युद्धपातळीवर करावे, जेणेकरून दक्षिण पश्चिम नागपूरच्या नागरिकांना दिलासा मिळेल, असे निर्देश जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिले.
बुधवार (ता.२८) जलप्रदाय समिती पिंटू झलके यांनी नालंदा नगर व श्री नगर येथील पाण्याच्या टाकीचे बांधकामाची पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौंगजकर, कनिष्ठ अभिंयता श्री. सुरेश भजे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी पाहणी करताना दोन्ही टाक्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दोन्ही टाक्यांवरून पाणी सोडण्यात यावे, जेणेकरून दक्षिण पश्चिम नागपूरच्या नागरिकांना दिलासा मिळेल व त्यांचा पाणी प्रश्न सुटेल, असे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी दिले.