Published On : Wed, Jun 12th, 2019

पी आय ढेरे नि कुख्यात सराईत गुन्हेगाराला केला दीड वर्षासाठी हद्दपार

कामठी:-नागपूर शहर पोलीस आयुकतालय अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रामगढ परिसरात वास्तव्यास असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगारास डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या आदेशान्वये नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी एक वर्ष सहा महिन्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिसराच्या सीमेतून हद्दपार केल्याची कारवाही आज केली असून हद्दपार केलेल्या या सराईत गुन्हेगाराचे नाव रवी उर्फ ढोकला वल्द गोविंदा वाघाडे वय 22 वर्षे रा रामगढ अनाज गोडाऊन जवळ कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर हद्दपार केलेला इसमावर प्राणघातक हल्ला करणे, हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणे, संगनमताने मारझोड करणे, अश्लील शिवीगाळ देणे,परिसर्टिक व्यावसायिक व रहिवाशी लोकांचे मालमत्तेस इजा, भय निर्माण करणे यासारखे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकारचे गुन्हे करण्याचा सवयाधीन आहे व त्याच्या या सवयीमुळे परिसरात प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

तेव्हा असे कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने तसेच त्यास गुन्हे करण्याची प्रवृत्ती सुरूच ठेवल्याने या इसमास असल्या प्रकारच्या गंभीर गुन्हे प्रवृत्तीपासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने व नागरिकांच्या सुरक्षात्मक दृष्टी कोनातून कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे या उद्देशाने परिमंडळ क्र 5 चे नागपूर शहर पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार


यांच्या आदेशांनव्ये सदर इसमास दीड वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.या हृद्यपारीच्या यशस्वी कारवाहिसाठो वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे,पो हवा ज्ञानचंद दुबे, महेश नाईक,प्रमोद वाघ, वेद यादव, मंगेश गिरी, ललित शेंडे, राजेश पैडलवार यांनी केली.