कोच्ची, केरळ: अखिल भारतीय बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 2024-25 च्या पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलीस टेबल टेनिस संघात स्थान मिळवणारे नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप खोब्रागडे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने देशभरात धुमाकूळ घातला. त्यांनी 40+ वयोगटात कांस्य पदक पटकावून आपली वर्चस्वाची छाप सोडली.
स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातील उत्कृष्ट खेळाडू सहभागी झाले होते. हर्षदीप खोब्रागडे यांनी आपल्या कौशल्याच्या आणि जिद्दीच्या प्रदर्शनामुळे महाराष्ट्र पोलिस दलासाठी ऐतिहासिक कांस्य पदक मिळवले. त्यांच्या या कामगिरीसाठी नागपूर शहर पोलीस आयुक्त, डॉ.रवींद्र सिंघल यांनी त्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.
नागपूर शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी, अंमलदार तसेच नागरिक यांच्या वतीने हर्षदीप खोब्रागडे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. हर्षदीप खोब्रागडे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. पोलीस दलातील उत्कृष्ट कार्य आणि क्रीडाविकासाची ही उदाहरणे निश्चितच प्रेरणादायक आहेत, आणि हर्षदीप यांच्या यशाने महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.