Published On : Tue, Jul 14th, 2015

भंडारा (पवनी) : प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज पुण्यतिथी उत्सव

wasudewanand saraswati
पवनी (भंडारा)। प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी 1909 साली आपला 19 वा चातुर्मास पवनी येथे वैनगंगा नदीच्या काठावर केला. महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या विदर्भाची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पवनी नगरीत स्वामींचा पुण्यतिथी उत्सव मागील अनेक वर्षपासून मोठ्या भक्तीभावाने संपन्न होतो. याही वर्षी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा 101 वा पुण्यतिथी उत्सव व साधना मंदिरात सहावा वर्धापन दिन महोत्सव शुक्रवार 17 जुलै ते शनिवार 25 जुलै पर्यत पवनी येथील विठ्ठल गुजरी वार्डातील साधना मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

17 जुलै ला पुण्यतिथी निमित्त सकाळी 8 वा. धुंडीराज पिंपळापुरे यांच्या पौरोहीत्याखाली यजमान भालचंद्र चिंचाळकर यांचे हस्ते लघुरुद्र महापूजा दु. 12 वा. आरती व त्यानंतर उपस्थित स्वामी भक्तांना महाप्रसाद वितरीत केला जाईल. 18 जुलै पासून जयंत लखोटे ऋग्वेद संहिता स्वाहाकार यज्ञ प्रारंभ करणार असून आचार्य वेदमूर्ती कृष्णाशास्त्री आर्वीकर सकाळी 8 ते 12:30 पर्यंत हवन करणार आहेत. दु.3 ते 5 वाजे पर्यंत नागपूर येथील प्रसिद्ध गायक भाऊराव भट यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

रविवारी 19 जुलै ला साधना मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळया निमित्त सकाळी 6 वा. पासून संस्कार व उपासना परिवार नागपूर तर्फे श्री गुरुचरित्राचे एक दिवसाचे साखळी पारायान व सकाळी 9 वा. वर्धापन दिना निमित्य महापूजा प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवा दरम्यान नागपूर येथील लोकांची शाळा येथील प्राध्यापिका वैशाली काळे यांचे 20 जुलै ला श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जीवन चरित्रावर प्रवचन इत्यादी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी सर्व साधक भक्तांनी अगत्यपूर्वक येउन सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सेवा मंडळ साधना मंदिर विश्वस्त मंडळ पवनी तर्फे करण्यात आले आहे.