नागपूर : दक्षिण नागपूरमध्ये २१ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी “भव्य तिरंगा यात्रा” काढण्यात आली. या यात्रेला नागपूरकर नागरिकांनी उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
लोकप्रिय आमदार मा. मोहन गोपाळराव मते यांच्या मार्गदर्शनात आयोजित या यात्रेत छोटा ताजबाग ते तिरंगा चौक परिसर तिरंग्याच्या लाटांनी सजला होता. हजारो नागरिक “भारत माता की जय”, “जय हिंद”, “वंदे मातरम” अशा घोषणांसह सहभागी झाले. तिरंगा केवळ ध्वज नसून आपली अस्मिता आहे, ही भावना स्पष्टपणे जाणवत होती.
यात्रेत सर्व वयोगटातील नागरिक, विद्यार्थी, महिला, युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. देशभक्तीपर गाणी, ढोल-ताशांचे गजर, वेशभूषा केलेली बालके आणि शिस्तबद्ध मिरवणूक यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले.
यात्रेत सहभागी मान्यवर:
मा. मोहन मते (आमदार दक्षिण नागपूर), संजय भेंडे (उपाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र), दयाशंकर तिवारी (शहराध्यक्ष, नागपूर महानगर), जितेंद्र (बंटी) कुकडे, बादल राऊत (भाजयुमो शहराध्यक्ष), विजय आसोले, रितेश पांडे, सौ. ज्योती देवघरे, आणि अमर धरमारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजयुमो, दक्षिण नागपूर मंडळाचे पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष, संयोजक आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. अध्यक्ष कुलदीप माटे यांनी सर्वांचे आभार मानले.
ही तिरंगा यात्रा केवळ मिरवणूक नव्हती, तर ती देशभक्ती, एकता आणि शौर्याचा सजीव संदेश होता.