Published On : Fri, Jul 5th, 2019

पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणुक – मतदार यादी प्रकाशित

Advertisement

नागपूर: शहरातील सर्व फेरीवाल्यांना सुचित करण्यात येते की, नागपूर महानगरपालिकेमार्फत जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१६ दरम्यान पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका क्षेञातील (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) २०१४ अन्वये, महाराष्ट्र नियम २०१६ अन्वये नगर पथविक्रेता समितीतील पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणुक प्रक्रिया राबविण्याकरीता सर्व्हे मध्ये नमुद असलेल्या पथविक्रेत्यांची तात्पुरत्या स्वरुपाची ‍ प्रथम मतदार यादी झोन क्र. १ ते १० अंतर्गत समाज कल्याण विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर महानगरपालिका, नागपूर तसेच www.nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर यादी प्रकाशित करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने कालबध्द कार्यक्रमानुसार दि. ०५ जुलै २०१९ रोजी यादी प्रकाशीत करण्यात येईल. दि. ०८ जुलै ते २२ जुलै, २०१९ आक्षेप स्वीकारणे, दि. २२ जुलै ते २६ जुलै २०१९ आलेल्या आक्षेपांचे निराकरण, दि. ३० जुलै २०१९ अंतिम मतदार यादी प्रसिध्द आणि ३१ जुलै २०१९ अंतिम मतदार यादी निवडणुक निर्णय अधिकारी यांना सादर करण्यात येईल. असे दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, समाज कल्याण विभाग म.न.पा. यांनी कळविले आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement