Published On : Mon, Jun 17th, 2019

कन्हानचा प्रतिक वानखेडे अभियांत्रि कीत ९६% अंकाने नावलौकिक

शासकीय तंत्रनिकेन नागपुर सिव्हिल इजिनिअरिंग मध्ये प्रथम.

कन्हान : – येथील होतकरू प्रतिक वानखेडे हयानी शासकीय तंत्रनिकेन नागपुर सिव्हिल इजिनिअरिंग मध्ये ९६.०८% ने उत्रीर्ण होऊन प्रथम क्रमांक पटकावित कन्हान शहराचा नावलौकिक व कौतुकास्पद कार्य केल्याने त्याचे सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव करित शुभेच्छा देण्यात येत आहेत.

स्वामी विवकानंद नगर कन्हान येथील प्रतिक प्रदीपराव वानखेडे शासकीय तंत्रनिकेन नागपुर येथुन सिव्हिल इजिनिअरिंग या विभागातून ११२५ पैकी १०८१ गुण घेत ९६.०८ % गुण प्राप्त करून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळवला.

उपरोक्त निकालानुसार त्याची शासनाचा सुवर्ण पदक सुद्धा प्राप्त होणार आहे. एका सर्वसाधरण कास्तकार व वारकरी- माळकरी परिवारात जन्मलेल्या मुलाने घरची परिस्थिती बेताचीच असताना व कुठलीही स्पशेल शिकवणीची व्यवस्था नसतांना केवळ स्वत:च्या मेहनतीने, जिद्दीने तसेच प्राचार्य डॉ थोरात सर, विभाग प्रमुख प्रा गिरडकर सर यांच्या मार्गदर्शनात गोल्ड मेडल रुपी यश संपादन केल्या बद्दल प्रतिकचे त्याच्या आई, वडील व आजीच्या समक्ष त्याच्या निवासस्थानी जाऊन नागपुर जि प उपाध्यक्ष, आरोग्य व बांधकाम सभापती शरद डोणेकर व सहकारी संजय कोलते, गोविंद जुनघरे, आकाश पंडितकर, अवधेश रॉय आदीने पुष्पगुच्छ व पेढे वाटून प्रतिक वानखेडे ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.