Published On : Mon, Jul 1st, 2019

रेल्वे गाडी उशीरा येत असल्याने प्रवाश्यांचे आंदोलन

लोकप्रतिनिधी व रेलवे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत -प्रवाश्यांनी व्यक्त केली नाराजी, रेल्वे च्या लेट लतीफीचा प्रवाशांना बसतो फटका रामटेक -नागपुर वरुन येणारी रामटेक लोकल ट्रेन नेहमीच उशीरा येत असल्याने त्रस्त रामटेक वासियांनी आंदोलनाच पवित्रा घेतला असुन यापुढे जर रेल्वे उशीरा आली तर तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा रामटेक वासियांनी दिला. यावेळी मोट्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली.

रामटेकला ईतवारी ते रामटेक तीन फे-या होतात परंतु रात्री येणारी गाडी ही नेहमीच उशिरा येत असल्याने प्रवास्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार स्टेशन मास्तरल विचरणा केली असता, समर्पक उत्तर न दिल्याने आंदोलन करावे लागल्याची माहिती आंदोलन कर्त्यांनी दिली. रामटेक – नागपूर धावणाऱ्या धावणाऱ्या गाडीची लेटलतीफी नेहमीचीच बाब असल्याने प्रवाशांचे नेहमीच हाल होत असल्याची तक्रार प्राप्त झाली

रामटेक इथून नागपूर करीता रेल्वे सुटण्याची वेळ तर नागपूर वरून रामटेक करीता रेल्वे सुटण्याची वेळ हया गंभीर बाबींवर रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते .ह्यावेळी रेलवे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित समस्यांचे निराकरण करावे असे सांगीतले .आंदोलन करते वेळी उदयसिंग यादव ,अँड . आनंद गजभिये ,राजू हटवार ,रमेश कारामोरे तुळशीराम कोठेकर ,पिण्टु भोयर ,गणेश बावनकुळे सह परिसरातील नागरिक व प्रवाशी सहभागी झाले होते .रेलवे चे अधिकारी सर्वे करीता येतात पण प्रवाश्यांच्या हाल कड़े त्यांचे लक्ष नसणे हे कितपत योग्य आहे..हया गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे व रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात आहे .