Published On : Mon, Jul 1st, 2019

‘इंटर्नशीप आणि मेंटॉरशीप’साठी जी-कॉम करणार सहकार्य

संचालक मंडळाचे सदस्य ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ संकल्पनेने प्रभावित

नागपूर : नागपुरात ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शहर विकासासाठी मांडलेल्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली. हा उपक्रम शाश्वत विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे. या उपक्रमाने जी-कॉमचे संचालक मंडळ प्रभावित झाले असून या उपक्रमाच्या माध्यमातून आलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने ग्लोबल कोव्हेनन्ट ऑफ मेयर्स (जीकॉम) इंटरर्नशीप आणि मेंटॉरशीपसाठी सहकार्य करणार आहे.

Advertisement

महापौर नंदा जिचकार ह्या ग्लोबल कोव्हेनन्ट ऑफ मेयर्स (जीकॉम) या परिषदेवर दक्षिण आशियातून एकमेव बोर्ड सदस्य आहेत. २६ आणि २७ जून रोजी जीकॉमच्या संचालक मंडळाची बैठक फ्रान्समधील पॅरिस या शहरात पार पडली. बैठकीला जीकॉम संचालक मंडळाचे अध्यक्ष मिशेल ब्ल्यूम्बर्ग (Michael Bloomberg), मॅरॉस सेफ्कोविक (Maros Sefcovic), क्रिस्टियाना फिग्युरेस (Christiana Figueres) यांच्यासह घानामधील आक्रा या शहराचे महापौर महंमद ॲडजेई सोव्हा (Mohd. Adjei Sowh), मोरोक्कोच्या शेफ चोहोहीन शहराचे महापौर महंमद सिफेनी (Mohd. Sefiani), जर्मनीच्या हिडलबर्ग शहराचे महापौर ईकार्ट व्हुर्जनर (Eckart Wurzner), भारतातील नागपूर या शहराच्या महापौर नंदा जिचकार (Nanda Jichkar), फ्रान्समधील पॅरिस शहराच्या महापौर ॲनी हिडाल्गो (Anne Hidalgo), यूएसएच्या पिटस्‌बर्ग शहराचे महापौर बिल पिडुटो (Bill Peduto), जीकॉमच्या कार्यकारी संचालक अमान्डा ईचेल (Amanda Eichel) यांची उपस्थिती होती.

जीकॉम संचालक मंडळाच्या बैठकीत पर्यावरण आणि ऊर्जा या विषयावर पुढील १२ महिन्यात आयोजित विविध उपक्रमांमध्ये जीकॉमच्या सहभागाविषयी नियोजन करण्यात आले. पुढील वर्षभरात सी-४० मेअर्स समीट (C-40 Mayors Summit), सेऊल मेअर फोरम (Seoul Mayors Forum), यूसीएलजी वर्ल्ड काँग्रेस (UCLG World Congress), कॉप-२५ (Cop-25) असे विविध आयोजन असून यामध्ये जीकॉम सहभागी होणार आहे.

या संपूर्ण उपक्रमातील सहभागासंदर्भात धोरणात्मक निर्णय यावेळी घेण्यात आले. जीकॉम सहभागी होणाऱ्या उपक्रमातील विषयांच्या प्राथमिकता यावेळी ठरविण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने इनोव्हेट फॉर सिटीज्‌ (Innovate4Cities), डाटा फॉर सिटीज्‌ (Data4Cities), इन्व्हेस्ट फॉर सिटीज्‌ ~Invest4Cities) या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. इनोव्हेट फॉर सिटीज्‌ अंतर्गत मिशन इनोव्हेशन पार्टनरशीप (Mission Innovation Partnership), स्टुडंट एनर्जी पार्टनरशीप (Student Energy Partnership), सिटीज ॲण्ड क्लायमेट सायन्स कॉन्फरन्स (Cities & Climate Sceince Conference), रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन टेक्नीकल (Research & Innovation Technical) आदीं विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या शहराची डाटा सिस्टीम तयार करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

संचालक मंडळाच्या या बैठकीत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व केले. नागपूर शहरात शाश्वत विकासाच्या दृष्टीने पर्यावरण आणि ऊर्जा या क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. महापौर इनोव्हेशन अवॉर्डबाबत माहिती देत उपक्रमाची चित्रफीत दाखविली आणि सादरीकरण केले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक नवनवीन संकल्पना मांडण्यात आल्या. त्याचा उपयोग शहर विकासात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी जीकॉमने सहकार्य करावे, अशी विनंतीही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement