Published On : Mon, Mar 8th, 2021

अडकलेला मांजा काढण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा

Advertisement

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाचे आवाहन

नागपूर : शहरात झाडे, इमारतींचे छप्पर, विद्युत खांब व इतर ठिकाणी अडकलेला नॉयलॉन मांजा काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी अडकलेला मांजा काढण्यासंदर्भात मनपाने मोहिम सुरू केलेली आहे.

Advertisement

या मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था तथा नागरिकांनी सहभागी होउन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.

मकर संक्रांतीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येते. मात्र पतंग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजाचा उपयोगही केला जातो. हा नॉयलॉन मांजा अत्यंत धोकादायक असून त्यामुळे पशु पक्षी आणि नागरिकांनाही त्यामुळे दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत.

त्यादृष्टीने शहरातील ज्या ठिकाणी नॉयलॉन मांजा अडकलेला आहे अशा सर्व ठिकाणचा मांजा काढण्याबाबत सहकार्य करण्यात यावे. याशिवाय मांजा अडकलेल्या ठिकाणची माहिती संबंधित झोन कार्यालयात द्यावी किंवा मनपाच्या १८००२३३३७६३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement