Published On : Mon, Mar 8th, 2021

एक दिवसाची महिला पी आय ठरली महिला पोलीस हवालदार

कामठी -महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय मेंढे यांच्या संकल्पनेतून 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ‘पोलीस दलावर महिला पोलिसांचे कंट्रोल’या अभिनव उपक्रमांतर्गत स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे एक दिवसाचा कारभार एक दिवसाची पी आय म्हणून महिला पोलीस हवालदार मुन्नीताई ठाकूर यांना पदभार देण्यात आला.

याप्रसंगी पोलीस कर्मचारी सुजाता कुर्वे,अर्चना वासनिक,कंचलता मडावी,सपना राणे,मनीषा माहुरले आदी महिलां उपस्थित होते.महिला पोलीसानी पोलीस स्टेशन चा एक दिवसीय दैनंदिन कामकाज सुव्यवस्थित पार पडला असून आज या नवीन कामठी पोलीस स्टेशन ला महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कंट्रोल आले होते.

नवीन कामठी पोलीस स्टेशन ला जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने पार पडला असून कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक संजय मेंढे , सहाययक पोलीस निरीक्षक सुरेश कर्नाके यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी केलेल्या मार्गदर्शनातून भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला देवीचे स्थान असून त्यांना पूज्यनीय ठरविले आहे तेव्हा समाजामध्ये महिलांचा आदर सम्मान वाढलेच पाहिजे व यादृष्टीने प्रयत्न करणाऱ्यांवर भर दिला. समाजातील दलित आर्थिकदृष्ट्या कमकुवत निराधार महिलांना आधाराचे स्थान मिळावे यादृष्टीने समाजाने लक्ष देण्याची गरज आहे .संचालन पोलीस कर्मचारी मयूर बन्सोड तर आभार शाहिद शेख यांनी मानले. – संदीप कांबळे,कामठी