Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Nov 9th, 2017

  जर्मनी येथे होणाऱ्या यूएनएफसीसीसी सीओपी23 परिषदेत महापौर नंदा जिचकार होणार सहभागी

  Nanda-Jichkar
  नागपूर: जर्मनीतील बॉन येथे होणा-या यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत.

  गेल्या दहा वर्षांपासून नागपूर आयसीएलईआय सदस्य असून आयसीएईआय दक्षिण आशिया सोबत अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि संसाधन कार्यक्षमता प्रकल्पांसाठी कार्यान्वित असून अर्बन नेक्ससच्या ऊर्जा, पाणी आणि अन्न यावर कार्य सुरू आहे.

  आरईएक्सकॉमकरिता ऑनलाईन मतदान करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण आशियामधून ४१ सदस्यांनी मतदान केले. भारताला या निवडणुकीत दुसरे सर्वाधिक म्हणजेच २८ मते मिळाली. मतदानाची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ६ ऑक्टोबर रोजी मतदान बंद करण्यात आले. निकाल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. महापौर नंदा जिचकार ह्यांचा विषय संसाधन कार्यक्षमता हा असून या क्षेत्रातील कामांना नागपूर शहरातच नव्हे तर विभागात प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्य करतील. आरईएक्सकॉमच्या सदस्या म्हणून जर्मनी बॉन येथे १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित परिषदेत त्या सहभागी होणार आहेत. यात त्या नागपूरमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती जागतिक पातळीवर सादर करणार आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145