नागपूरचा गडकरी वाडा म्हणजे नागपुरातील एक महत्त्वाची वास्तू. या वास्तूमध्ये अनेक राजकीय घडामोडींबाबत आजवर चर्चा झाली आहे. अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार म्हणजे हा गडकरी वाडा. नागपूर येथील महाल भागातील अरूंद केळीबाग रस्ता मोठा होणार आहे. त्याचसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाड्याचा काही भाग घेतला जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यालगत असलेला केळी बाग रस्ता ८० फूट रुंद होणार आहे. त्याचमुळे गडकरी वाड्याचा काही भाग आणि शेजारची काही दुकाने आणि घरे यांचा भाग जाणार आहे. यामुळे सामान्य नागपूरकरही काहीसे धास्तावले आहेत.
गडकरी वाड्याच्या शेजारच्या भागात असलेल्या जमीन मालकांचे दशकांपासून भाडेकरू आहेत. रुंदीकरणात पैसे किंवा टीडीआर मिळणार नसल्याने मालकांनी कोर्टात धाव घेतली आहे तर भाडेकरूंनी गडकरींकडे धाव घेतली आहे असेही समजते आहे.