Published On : Wed, Jul 24th, 2019

पालकांनी आपल्या पाल्य सोबत मित्र सारखे राहावे:डॉ.परिणिता फुके.

प्रभाग क्र १३ येथे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

नागपूर:- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागतील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हिलफोर्ट पब्लिक शाळा,हिलटॉप येथे नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांच्या तर्फे आयोजित कण्यात आला होता.यावेळी मा.सुधाकर देशमुख (आमदार पश्चिम नागपूर),मा किसन गावंडे
(अध्यक्ष पश्चिम नागपूर बीजेपी),मा.अमर बागडे (झोन सभापती,धरमपेठ),रुतीका मसराम (नगरसेविका),रवी वाघमारे,विखिलेश टाकभवरे व जानकी गणेश प्रामुख्याने उपस्तिथ होते.

आपले मनोगत व्यक्त करतांना नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांनी विध्यार्थ्यांवरती पालकांनी कुठलेही बंधन लादु नये.त्यांना योग्य तो निर्णय घेण्यास मदत करावी.पालकांनी आपल्या पाल्य सोबत मित्र सारखे राहावे.त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात.वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करावे.त्यांच्या आवडी निवडीचा विचार
करून त्यांना सहकार्य करावे.एखाद्या विध्यार्थ्याला दहावी किंवा बारावीत कमी गुण मिळाले तरी त्यास योग्य मार्गदर्शन करावे.कदाचित तो उद्याचा आय.ए.एस.किंवा मोठा प्रशासकीय अधिकारी असेल.मी या ठिकाणीएवढेच सांगेल कुठल्याही विध्यार्थ्याला कमी लेखू नये.आपले मुख्यमंत्री हे उच्च शिक्षित आहेत.त्यांचा आदर्श पुढे ठेऊन विद्यार्थ्यांनी समोर वाटचाल करावी.

आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार सुधाकर देशमुख यांनी या देशात विध्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत.आज मोठ्या प्रमाणात विध्यार्थी या देशाचे नावलौकिक करीत आहेत.सचिन तेंडुलकर,महेंद्र सिंग धोनी,सायना नेहवाल,पी.वि.सिंधू यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत,या देशात मोठ्या प्रमाणात
आय.आय.टी.सेक्टर त्यात आहेत.या ठिकाणी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले त्याचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन.

छोटेखाणी झालेल्या समारंभात कार्यक्रमाचे संचालन सविता रेलकर यांनी केले तर आभार हिरु चौधरी यांनीमानले.यावेळी विजय चौरे,सोनू मेंढे,पुंडलिक मसुरकर,पंकज खडगी,अनुप शेवते,मयूर सोनकर,घनश्याम अजागिया,मनोज पोतदार विजय डोंगरे व मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्तिथ होते.