Published On : Wed, Jul 24th, 2019

रक्तदान करून भारतीय मजदूर संघाचा स्थापन दिन साजरा

कन्हान : – गोंडेगाव कोळशा खुली खदान येथील भारतीय मजदूर संघा व्दारे रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्थापना दिन साजरा करण्यात आला.

भारतीय मजदूर संघाच्या स्थापना दिना निमित्य गोंडेगाव कोळशा खुली खदान येथील दवाखान्यात गोंडेगाव खुली कोळशा खदान भारतीय मजदूर संघा व्दारे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ७० कामगारांनी रक्तदान करून स्थापन दिन साजरा केला.

याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे महामंत्री जयंत आसोले, गोंडेगावचे सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे, ग्रा प सदस्य सुनिल धुरिया, संजय कात्यायनी, प्रणय खवले सह गोंडेगाव कोळशा खुली खदान चे कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. डॉ हेगडेवार रक्तपेढी नागपुर चे डॉक्टर व चमुनी विशेष सहकार्य केले. सर्व रक्तदात्याना भारतीय मजदूर संघ व डॉ हेगडेवार रक्तपेढी नागपुर च्या वतीने एक एक बँग भेट देण्यात आली.