Published On : Thu, Aug 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पेपरफुटीला कायमचा लगाम! केंद्राचा कडक कायदा महाराष्ट्रात लागू होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Advertisement

मुंबई : स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी केलेला कठोर कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया येत्या पंधरवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील शासकीय सेवाभरती आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करण्यावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

Gold Rate
Aug 13 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,600 /-
Silver/Kg ₹ 2,36,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकणार-
परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे.

समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागात प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांशी संवाद साधणार आहे. त्यांच्या सूचना आणि अडचणी जाणून घेतल्यानंतर समिती शासनाला सविस्तर अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे राज्यासाठी प्रभावी आणि पारदर्शक परीक्षा धोरण तयार केले जाणार आहे.

Advertisement

२५ हजार सुरक्षित वर्गखोल्या उभारण्याचे निर्देश-
परीक्षांमध्ये कॉपी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात किमान २५ हजार सुरक्षित वर्गखोल्या उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. परीक्षा केंद्रांवर प्रशासन आणि पोलिसांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

परदेशातील परीक्षा पद्धतींचाही अभ्यास-
जगातील प्रगत देशांमध्ये परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातात, तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो आणि गैरप्रकारांना कशा प्रकारे आळा घातला जातो, याचा अभ्यास करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या पद्धतींमधील उपयुक्त बाबी महाराष्ट्राच्या परीक्षा व्यवस्थेत लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये आणि भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व्हावी, यासाठी कायदेशीर कारवाईसोबतच संपूर्ण परीक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याचा सरकारचा निर्धार या बैठकीत स्पष्ट झाला.

Advertisement
SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news  #nagpurnews

SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news...

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews #crimenews #accusedarrested

महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews...

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges