Published On : Fri, Jul 26th, 2019

राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने कारगील दिवस उत्साहात

कामठी :-स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील एनसीसी युनिट द्वारा 26 जुलै कारगिल विजयाला वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कारगील विजय दिनी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाची सुरुवात एनसीसी युनिट द्वारा परेड, झेंडा वंदन व शहीद जवानांना मानवंदना देऊन करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र बागडे यांनी भारतीय सेनेतील जवानांकडून विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रेरणा घेत आपले कर्तव्य निर्वाह करण्यास सांगितले.रॅलीची सुरुवात प्राचार्य डॉ महेंद्र बागडे , पी आय स्टाफ, 20 बटालियन महाराष्ट्र नागपूर चे अधिकारी निर्मलसिंग, एनसीसी युनिट अधिकारी डॉ श्याम खंडारे, यांनी फित कापून केली .ही रॅली पोरवाल महाविद्यालयाच्याअ प्रांगणातून शुभारंभ करीत डॉ चौधरी हॉस्पिटल मार्गे, श्री राम मंदिर चौक, नेताजी चौक, पोलीस स्टेशन चौक, बँक ऑफ महाराष्ट्र चौक, जयस्तंभ चौक आदी मार्गे भ्रमण करीत पोरवाल कॉलेज ला पोहोचून राष्ट्रगीताने रॅलीचे समापन करण्यात आले.

संदीप कांबळे कामठी