Published On : Tue, Dec 25th, 2018

पंचायत ते पार्लियामेंट : सोशल मीडिया ठरवेल निवडणुकांची दिशा आणि दशा – अजित पारसे

Advertisement

नागपुर: कोणत्याही संघटनेचा व पक्षाचा मूलमंत्र हा सर्वाना सामावून घेणारा म्हणजेच ” सर्व स्मूचय ” असला पाहिजे , कोणत्याही प्रकारचे ” विभूती पूजन ” नसलेल्या संघटनांचे प्रचार, प्रसार वं यश हे दीर्घकाळ यशस्वीरीत्या टिकून राहत . सुधृढ लोकतंत्रासाठी पक्ष व संघटनेची उद्दिष्ट मजबूत असावी लागतात , ज्या संघटना व पक्ष मूळ उद्दिष्टांशी तडजोड करून वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेला प्राधान्य देतात त्या पक्ष वा संघटना मृतप्राय , निष्क्रिय होण्यास वेळ लागत नाही. मूळ उद्दिष्टांशी कोणतीही तडजोड ना करणाऱ्या संघटना , पक्षांचे स्थान राजकारणात , समाजकारणात वसत्ताकारणात उच्च पदावर पोहचले आहे . सद्य परिस्थितीत सोशल मीडिया हे संघटनेच्या पक्षाच्या उद्दिष्टांना समाजात तळागाळात पोहचवण्याचे अत्यंत प्रभावी साधन बनले आहे ., सोशलमीडिया च्या सकारात्मक , प्रभावी वापर करून समाजातील तळागाळातील सोशिक , वंचित समाजाला सत्तेत सक्रिय भागीदारी मिळवून देण्यास मदत होईल .

२००८ मध्ये सर्वप्रथम बराक ओबामा यांनी जंगल सोशल मीडिया ची ताकद , प्रभाव दाखवला . फेसबुक, Twitter व अश्याच अनेक माध्यमांनी संयुक्त राष्ट्र निवडणुकांत राष्ट्रपती पद यशस्वीरीत्या खेचून आणले होते . त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पण सोशल मीडिया च्या ताकदीवर अवघड आणि अनपेक्षित राष्ट्रपती पद एकतर्फा जिंकून आणले होते . आजच्या तारखेत बऱ्याच अंतर राष्ट्रीय संस्था प्रत्येक मतदाराचा ” Psychosomatric Profile ” तयार करून निवडणुकांचे प्रचार, प्रसार व निकालांवर निर्णायक प्रभाव पाडून जनमत ढवळून काढतातव त्या अनुषंगाने संघटना,पक्ष आप आपली धोरणे ठरवतात . ग्राउंड लेवल कार्यकर्ता हा सोशल मीडिया च्या माध्यमाने पक्षाच्या धोरणांशी, पदाधिकाऱ्यांशी कायम स्वरूपी जोड्याल्या जातो व अधिक प्रभावशाली पद्धतीने निवडणुकांमध्ये जनतेशी सर्व स्तरांवर एकरूप होता येईल . येणाऱ्या काळात निवडणुका मुख्यत्वे स्मार्टफोन , लॅपटॉप व कॉम्पुटर वर सोशल मीडिया द्वारे लढवण्यात येतील व निर्णय देतील असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही .

कोणत्याही संघटना वा पक्षाची विंनिंग ऍबिलिटी ही संपूर्ण संघटनेच्या सामुदायिक सोशल मीडिया फॉलोवर बेस नी तपासली गेली पाहिजे . समाजकारणात, राजकारणात व सत्ताकारणात संघटना, पक्षातील सर्व प्रतिनिधींना म्हणजेच पंचायत ते पार्लियामेंट मध्ये सर्व सदस्यांना वैयक्तिक सोशल मीडिया फॉलोवर बेस निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे , ह्याच फॉलोवर बेस नी प्रतिनिधींना जनतेचा विश्वास सकारात्मक रित्या प्राप्त करून घेता येईल . सक्रिय, कायम स्वरूपी सोशल मीडिया फॉलोवर बेस हा प्रत्येक प्रतिनिधींना नागरिकांमध्ये घर घरात यशस्वीरीत्या पोहचवून देईल . अश्या पद्धतींनी जनतेत विश्वास निर्माण केल्यास त्या प्रतिनिधीं सकट संपूर्ण पक्षाला , संघटनेला सुवर्णकाळ येईल हे प्रामुख्यानि लक्षात घेतले पाहिजे .

केंद्रीय स्तरावर सोशल मीडिया प्रशिक्षण सेल संघटित करून सर्व प्रतिनिधीना व त्यांच्या चमूला त्यात सक्रियरित्या भाग घेण्यास प्रोत्साहित केले गेले पाहिजे , फक्त एका व्यक्तीच्या सोशल मीडिया फॉलोवर बेस च्या आधारे संपूर्ण निवडणुकांच्या परिणामांचे गणित जुळवण्याचा धोका न पत्करता संपूर्ण पक्षाची प्रगल्भता व दृढता प्रस्थापित करून वैश्विक सोशल मीडिया फॉलोवर बेस कमावला जाऊ शकतो .

आज तशीच दृढता, प्रघाल्भता प्रस्थापित करून शहरा पुरता खासदार , गावाकरता आमदार व खेड्याकरता सरपंच का नाही कमाऊ शकत ? हीच सर्वात मोठी राजकीय शोकांतिका संघटनांनी, पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे . दुर्दैवानी केंद्रीय स्तरावरचे काही मोजके नेते वगळता प्रदेश, जिल्हा व शहर – तालुका नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधि चे सोशल मीडिया वर कोणताही कायम स्वरूपी, सक्रीय फॉलोवर बेस दिसत नाही . त्यामुळेच अनेक अस्मानी कर्तुत्व असलेल्या नेत्यांना अजूनही पक्षाला, संघटनांना तळागाळातील समाजाला सत्तेत सक्रीय आणि यशस्वी भागीदारी मिळउन देता आली नाही.

सोशल मीडिया च्या सकारत्मक वापरानी पंचायत ते पार्लियामेंट स्तरावरील प्रत्येक प्रतिनिधींची प्रतिमा बांधणी म्हणजे ” इमेज बिल्डिंग – ब्रांडिंग ” ही सर्वदूर सामान्यतल्या सामान्य नागरिकापर्यंतमूळ उदिष्टांसकट स्थापित करता येऊ शकते . प्रत्येक प्रतिनिधींची प्रतिमा, कामांचा आलेख, वचनांची पूर्ति इत्यादि दैनंदिन व प्रमुख मुद्दे जन सामान्यत अधिक विश्वास निर्माण करतील ज्याचाफायदा निश्चितच येणाऱ्या भविष्यत् पक्ष , संघटनेला सर्व स्तरावर होईल . संघटनेचा मूळ उदिष्टान्ना बगल न करता सोशल मीडिया च्या सकारात्मक, प्रभावी माध्यमानी भारतीय राजकारणात, समाजकारणात व सत्ताकारणात एक यशस्वी सर्व समुच्य लोकतंत्राचे उदहारण सम्पूर्ण विश्वासाठी निर्माण होईल